
वावडुंगी (जिल्हा रायगड) – मुरुड भागातील रानात रानडुकरांच्या शिकारीसाठी बाँब पेरण्यात येतात. तेथेच रानात गावकरी गुरे चारायला नेतात. त्यांतीलच एका बैलाच्या तोंडात चारा खात असतांना बाँब आल्याने त्याचा स्फोट होऊन बैलाचा जबडा पूर्ण फाटला. बैलाचे मालक मधुकर भुवड हे बैलाची दुरवस्था पाहून प्रचंड दुःख झाल्याने जोरजोरात रडायलाच लागले.
गावकर्यांनी पोलीस आणि वन विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही शिकार्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप केला आहे. ‘या बाँबमुळे एखादा माणूस घायाळ झाला, तर याचे दायित्व कोण घेणार ?’, असा चिंताजनक प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रसंगामुळे पोलीस आणि वनविभाग प्रशासन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन