
मुंबई – जैन मंदिरे हे सनातन धर्माचेच एक अंग आहे. मंदिरांचे रक्षण करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पेशवे यांनी मंदिरांचे रक्षण आणि पुनर्निर्माण केले आहे. त्यामुळे जैन मंदिरांना सिलिंडर उपलब्ध करू देण्याच्या मागणीवरून वादंग निर्माण करणे चुकीचे आहे, असे विधान सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले आहे.
श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले, ‘‘राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील १६ जैन मंदिरांना प्रत्येकी ५ सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला पत्र पाठवले होते. मंदिरांमध्ये ‘आयंबिल’ उत्सव असल्यामुळे सिलिंडर हवे होते. मंदिरांमध्ये शेकडो भाविक येतात. अशा वेळी शासकीय सुविधांविना कार्यक्रम होणे कठीण असते. या काळात सिलिंडरची टंचाई असल्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला पत्र देण्याची वेळ आली अन् या पत्राद्वारे व्यावसायिक सिलिंडरची मागणी करण्यात आली होती. मंदिरांचे रक्षण करणे, हे राजाचे प्रथम कर्तव्य आहे. महाभारतामध्ये ‘शान्ति पर्व’ यामध्ये ‘प्रजानां रक्षणं धर्मो राज्ञः परम उच्चते’ (अर्थ : प्रजेचे रक्षण करण,े हा राजाचा सर्वोच्च धर्म मानला जातो) असा श्लोक आहे. ‘प्रजेचे रक्षण करणे हेच राजाचे सर्वाेच्च कर्तव्य आहे’, असे म्हटले आहे. प्रजेचे रक्षण अर्थात् त्याच्यामध्ये समाजाच्या धार्मिक आस्थेचाही समावेश आहे. ही आपली भारतीय परंपरा आहे.’’
मंदिरांविषयी दाखवलेली आस्था योग्यच !
अनेक वेळा हिंदूंच्या मंदिरांच्या पाठीशी मंगलप्रभात लोढा उभे रहातात. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठही त्यांच्या पाठीशी उभे रहातात. मंगलप्रभात लोढा हिंदु मंदिरांनाही साहाय्य करतात. मुंबईतील मंदिरांमधील उत्सवांनाही ते विशेष साहाय्यासाठी प्रयत्न करतात. यासाठी खरेतर मंगलप्रभात लोढा यांचे कौतुक असायला हवे. जैन आणि हिंदु यांना वेगवेगळे दाखवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आहे. मंगलप्रभात लोढा यांनी मंदिरांविषयी दाखवलेली आस्था योग्यच आहे, हे सनातन संस्थेचे स्पष्ट मत आहे, असे श्री. अभय वर्तक म्हणाले.
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री