
कलबुर्गी (कर्नाटक) -‘कुंभकर्ण ६ महिने झोपायचा, तरी उर्वरित ६ महिने तो जागा असायचा; मात्र हिंदूंवर अनेक आघात होत असतांनाही तो झोपलेलाच आहे, तो जागा होत नाही’, असे श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक येथे म्हणाले. शहरातील कडगंची मठात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम सेनेच्या जिल्हा समितीचे उद्घाटन आणि नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
श्री. मुतालिक पुढे म्हणाले,
१. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यावर चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील अल्लीपूरच्या मुसलमानांनी निषेध नोंदवला. हे देशद्रोही कृत्य आहे. इराण-भारत युद्ध झाल्यास या देशातील मुसलमान कुणाच्या बाजूने असतील, याचा त्यांनी आताच उघडपणे संकेत दिला आहे.
२. छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक, श्री गणेश मिरवणूक आदी हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक आणि चप्पलफेक झाली आहे. पहलगाम आक्रमणात २६ हिंदूंची हत्या करण्यात आली, हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’द्वारे लक्ष्य केले जात आहे, तरीही हिंदू झोपलेले आहेत.
३. श्रीराम सेना गेल्या २१ वर्षांपासून हिंदु समाजाला संघटित आणि जागरूक करण्याचे काम करत आहे.
४. चित्तापूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाच्या घटनेचा संदर्भ देत मुतालिक यांनी ‘तुमच्या मतदारसंघात जुगार, खून, खंडणी आणि दरोडे होत असतांनाही तुम्हाला ते दिसत नाही’, असे म्हणत मंत्री प्रियांक खर्गे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
५. ‘माझ्यावर १२१ गुन्हे नोंदवले आहेत. एक सहस्र गुन्हे नोंदवले, तरी माझा आवाज दाबता येणार नाही. आपल्या धर्मातील शस्त्रपूजेची परंपरा नष्ट होत आहे, ही दुःखाची गोष्ट आहे.
हिंदु तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी संघटित झाले पाहिजे ! – भाग्या गौडा
‘हिंदु तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी संघटितपणे काम केले पाहिजे. घरात मुलांना संस्कार देण्याचे काम आई करते. त्यामुळे धर्मरक्षणाचे दायित्व पुरुषांपेक्षा १० पट अधिक महिलांवर आहे’, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या भाग्या गौडा यांनी त्यांच्या भाषणात काढले.
श्रीराम सेनेचे कायदेशीर सल्लागार आणि अधिवक्ता शिवकुमार सीरी म्हणाले, ‘‘हिंदुत्व आणि धर्मरक्षण यांच्याशी संबंधित कुठलेली गुन्हे नोंदवल्यास मी त्याविषयी कोणतेही शुल्क न आकारता काम करणार. या वेळी मक्तमपूरचे चरलिंग शिवाचार्य, माशाळचे मरुळाराध्य शिवाचार्य, दत्त मंदिराचे दीपक घनाते, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत स्वादी, एम्.एस्. पाटील नरिबोळ, चन्नय्या वस्त्राद जेरटगी, राजू भवानी, वीरेश पाटील, आनंद देसाई इत्यादी उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा