डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अती जोखमीची शस्त्रक्रिया

चिपळूण – दापोली तालुक्यातील वणंद येथील एका ७ महिन्यांच्या बाळाला १ महिन्यापासून सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला दापोली येथील बालरोगतज्ञांना दाखवले असता त्यांनी ‘एक्स-रे’ (क्ष-किरणांच्या साहाय्याने पडताळणे) काढण्याचा सल्ला दिला. या ‘एक्स-रे’मध्ये घशामध्ये ‘सेफ्टी पिन’ अडकल्याचे निदर्शनास आले आणि बालरोगतज्ञांनी त्वरित बाळाला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाण्यास सांगितले.
वालावलकर रुग्णालयात कान-नाक-घसा विभागाच्या डॉ. सीजा यांनी बाळाला तपासले आणि प्राथमिक तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले. कान-नाक-घसा विभागाचे तज्ञ डॉ. राजीव यांनी ‘युसोफॅगोस्कोपी’ (एक लवचिक, कॅमेरा असलेली नळीने) पडताळणी करून ‘सेफ्टी पिन’ घशाबाहेर काढली. अती जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात डॉ. राजीव आणि डॉ. सीजा यांना यश मिळाले.
अशा अती जोखमीच्या शस्त्रक्रिया यापूर्वीही वालावलकर रुग्णालयात झालेल्या आहेत. या ठिकाणी असलेले डॉक्टर आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. अनेक शस्त्रक्रिया या ‘महात्मा फुले आरोग्य योजने’तून केल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांवरील आर्थिकभारसुद्धा अल्प होत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा