मनसेच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने संगणकाधारित परीक्षेसाठी हिंदी किंवा इंग्रजी भाषा यांची सक्ती करणारा निर्णय रहित केला आहे. १६ मार्च २०२६ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेली भरती अधिसूचना रहित केली असून लवकरच नव्या अधिसूचनेद्वारे भरती प्रक्रिया पुन्हा घोषित केली जाईल. हिंदी-इंग्रजी भाषांच्या सक्तीमुळे राज्यातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत मनसे नेते अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला खडसावले होते.
मनसेने सांगितले की, निर्णय जरी मागे घेतला असला, तरी त्यांचा मूळ आक्षेप कायम आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेच्या परीक्षा मराठीत होत आहे. त्यामुळे नव्या अधिसूचनेत मराठीचा पर्याय आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !