
लातूर – जिल्ह्यात चमत्कार, जादूटोणा, काळी जादू, ज्योतिष किंवा अध्यात्म यांच्या नावाखाली शोषण करणारे ५२ भोंदूबाबा, तांत्रिक, मांत्रिक आहेत. त्यांच्या नावांची सूची ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने ३ वेळा पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना दिली आहे; मात्र यासंदर्भात अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही, असा खेद अंनिसच्या वतीने व्यक्त करण्यात आला. ५२ जणांची सूची पुन्हा एकदा देण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या वेळी समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे म्हणाले की, दैवी शक्ती, चमत्कार, भविष्य, ज्योतिष किंवा अध्यात्म यांच्या नावाखाली देव-धर्माच्या आडून अनेक ठिकाणी लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ, तसेच महिलांचे लैंगिक शोषण होण्याच्या घटना समोर येत आहेत. (बावगे यांनी ‘ज्योतिष’ आणि ‘अध्यात्म’ या शब्दांचा वापर करून थेट हिंदु संस्कृतीवरच निशाणा साधला आहे; मात्र अनेक दर्ग्यांमध्ये ‘भूतबाधा’ उतरवण्याच्या नावाखाली महिलांचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच अघोरी प्रथांविरुद्ध ‘अंनिस’ने किती वेळा पोलिसांना सूची दिली आहे ? – संपादक) अशा घटनांमुळे समाजात बुवाबाजी, अंधश्रद्धा वाढण्याचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळण्याचा धोका निर्माण होत आहे. म्हणून सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी कार्यवाही करावी. (ख्रिस्ती मिशनर्यांच्या प्रार्थनासभांच्या माध्यमातून असाध्य आजार बरे करण्याच्या भोंदूगिरीविषयी ‘अंनिस’ काही बोलत का नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकाया सूचीमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती पंथातील भोंदूंचा समावेश आहे का ? कि खरात प्रकरणाच्या नावाखाली नेहमीप्रमाणे हिंदूंनाच भोंदूगिरीच्या दाव्याआड लक्ष्य केले जात आहे ? हे पहाणेही महत्त्वाचे आहे. |
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.