पुणे येथील हिंदु संमेलन

पुणे – स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत हिंदु समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांप्रती पूर्णपणे जागृत होत नाही, तोपर्यंत हिंदूंचे प्रभावी एकत्रीकरण होणार नाही. भारत हिंदु राष्ट्र होता, आहे आणि राहीलच; मात्र आता प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवा, असे विधान ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. कोथरूड येथील परमहंसनगर येथे आयोजित ‘हिंदु संमेलना’त ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर संघचालक हिरामण जगताप, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, मनीषा बुटाला, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शरद पोंक्षे यांनी मांडलेले काही दाहक विचार !
१. ब्रिटिशांनी हिंदूंना त्यांचा इतिहास आणि संस्कृती यांपासून तोडले. इंग्रजी भाषा लादून आपल्याच धर्माची लाज वाटेल, अशी स्थिती निर्माण केली. परिणामी हिंदूंच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला.
२. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेसने ‘अहिंसे’च्या नावाखाली हिंदूंना घाबरट आणि दुबळे बनवले. यामुळे हिंदूंची अपरिमित हानी झाली आहे.
३. भारतीय शिक्षणपद्धती आदर्श होती, जिथे सर्व वर्ण समान मानले जात; मात्र ब्रिटिशांनी ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब करून हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक जातीभेद निर्माण केले.
हिंदूंनो, ‘आर्थिक नाकाबंदी’चे शस्त्र उचला ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते
काश्मीरमधील हिंदूंच्या विस्थापनाचा दाखला देत शरद पोंक्षे यांनी हिंदूंना सतर्कतेची चेतावणी दिली. ते म्हणाले, ‘‘हिंदूंनी आता सजग होऊन व्यवहार करणे आवश्यक आहे. भाजीपाला, फळे, सुतारकाम किंवा अन्य सेवा घेतांना समोरची व्यक्ती हिंदु असल्याची निश्चिती करूनच आर्थिक व्यवहार करा. ‘हलाल सर्टिफिकेट’ असलेल्या उत्पादनांवर पूर्णपणे बहिष्कार टाका. ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटांकडे दुर्लक्ष करू नका; आपल्या शेजारची मुलगी असुरक्षित असेल, तर आपणही सुरक्षित नाही, हे लक्षात ठेवा.’’
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !