हिंदु इतिहास दडपणार्‍यांच्या विरोधातील प्रखर आवाज : ‘द ताज स्टोरी’ चित्रपट ! – दिनेश देशमुख, जिल्हाध्यक्ष, हिंदु मंच

ठाणे, २६ मार्च (वार्ता.) – हिंदु धर्माच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवून सत्य उजेडात आणण्याची वेळ आता आली आहे. हिंदु समाजाने जागृत होणे आवश्यक आहे, असा ठाम संदेश ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटातून दिला जात आहे. हिंदु संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक आहे. हा चित्रपट त्या दिशेने प्रेरणा देणारा ठरत आहे, असे मत हिंदु मंचचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. दिनेश देशमुख यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.

श्री. देशमुख म्हणाले,…

१. या चित्रपटात ‘विष्णु शर्मा’ या पात्राची भूमिका अभिनेते परेश रावल यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. ताजमहालच्या इतिहासाविषयी वेगळा दृष्टीकोन मांडत सत्य शोधण्याची धडपड या कथेतून दिसून येते.

२. तीन पिढ्यांपासून पर्यटकांना मार्गदर्शन करणार्‍या कुटुंबाचा संघर्ष यात अधोरेखित करण्यात आला आहे.

३. चित्रपटात न्यायालयीन लढाई, पुरावे आणि साक्षीदार यांच्या माध्यमातून सत्य मांडण्याचा प्रयत्न दाखवण्यात आला आहे. प्रतिपक्षाकडून उभ्या रहाणार्‍या अडचणींवर मात करत पात्राची जिद्द प्रभावीपणे समोर येते.

४. शिक्षणव्यवस्थेत इतिहास कसा शिकवला जातो ? यावरही चित्रपटात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

५. समाजात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्यास हा चित्रपट उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हा चित्रपट पाहून विचार करावा.

संपादकीय भूमिका

राष्ट्र आणि धर्म हितार्थ चित्रपटांची निर्मिती अन् त्यांना मिळणारा प्रतिसाद हे हिंदु जागृत झाल्याचे लक्षण !