२० वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातने धमकावल्याचा अंनिस दावा !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीला धमकी

नाशिक – भोंदूबाबा अशोक खरातने २० वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. वर्ष २००७ मध्ये अंनिसचे कार्यकर्ते खरातच्या कार्यालयात गेल्यावर खरातने ‘माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे’, अशी त्यांना धमकी दिली होती. अंनिसने आव्हान दिल्यावर त्याने ३ मास त्याचे उद्योग बंद ठेवले होते. वर्ष २०१३ मध्येही खरात याने अंनिसच्या कार्यकर्त्यांना ‘माझ्या नादाला लागाल, तर तुमचे अस्तित्व मिटवून टाकीन’ असे धमकावले होते. त्यानंतर अधूनमधून अशोक खरातने याच्या कारवायांमुळे त्रस्त झालेले पीडित अंनिसकडे संपर्क करत होते; परंतु ते पोलिसांकडे जायला घाबरत होते, असाही दावा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

एवढी वर्षे या भोंदूबाबाविषयी अंनिससला ठाऊक आहे आणि अंनिसचा कायदा येऊनही एवढी वर्षे झाली आहेत, तर अंनिस यापूर्वी स्वतःहून पोलिसांत का गेली नाही ? अंनिसने गेल्या २० वर्षांत या भोंदूबाबाविषयी ‘ब्र’ही उच्चारला नाही. यामागे काय कारण आहे, याचाही शोध घ्यायला हवा !