गॅस टंचाईमुळे गणपतीपुळे देवस्थानाचा निर्णय !

रत्नागिरी – इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात व्यावसायिक गॅसच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची वेळ एक घंट्याने वाढवली आहे.
देवस्थानाने भक्तांच्या सोयीसाठी नवीन वेळापत्रक घोषित केले आहे. या वेळेपत्रकानुसार दुपारी १२.३० ते २ वाजण्याच्या ऐवजी आता ३ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.१५ च्या ऐवजी ८.४५ वाजेपर्यंत विनामूल्य महाप्रसाद मिळणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने येथील अनेक उपाहारगृहे आणि खानावळी सद्य:स्थितीत बंद आहेत, या पार्श्वभूमीवर देवस्थानाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सहस्रो भक्तांची गैरसोय दूर होणार आहे.
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच