
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – १५ दिवसांपूर्वी सोनगाव ‘कचरा डेपो’ला (कचरा डेपो म्हणजे नगर, शहर येथील कचरा एकत्र करून एका जागी टाकण्याचे ठिकाण) आग लागली होती. जकातवाडी ग्रामस्थांना धुराचा मोठा सामना करावा लागला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २३ मार्च या दिवशी ग्रामस्थांनी कचरा डेपोतील धुरावर उपाययोजना काढेपर्यंत कचरा डेपोकडे गाड्या न पाठवण्याचा आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांनी केलेल्या या कृतीमुळे सकाळी वाहतूककोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अधिवक्ता दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी जकातवाडी ग्रामस्थांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडत ‘सोनगाव कचरा डेपो’ला विरोध केला. सोनगाव कचरा डेपोवर सीसीटीव्ही छायाचित्रक लावणे, येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, कचरा डेपोतील दूषित पाणी गटारांद्वारे ओढ्यात सोडणे, धुराचा बंदोबस्त होईपर्यंत डेपोमध्ये कचरा टाकण्यात येऊ नये अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकचरा आगाराचे व्यवस्थापन करण्याची मागणी करून ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे स्थानिक स्वराज्य संस्थेला लज्जास्पद ! |
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात