देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रा. बाबासाहेब सुतार यांचे व्याख्यान

रत्नागिरी – भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनी खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांचे व्याख्यान आयोजित केले.

प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख सहा. प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी थीम ‘विज्ञानातील महिला : विकसित भारत उत्प्रेरक’ ही आहे. या दिनानिमित्त विज्ञान विभागाच्या वतीने ‘तारकीय रहस्ये : विश्वाची रहस्ये’ या विषयांवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्रा. बाबासाहेब सुतार यांनी व्याख्यान दिले. त्यांनी स्त्रियांचे अंतराळ संशोधनातील योगदान आणि शुभांशु शुक्ला यांची अंतराळ मोहीम संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले.

यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच अन्य शाखांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली इंदुलकर, तसेच आभार साईराज शिंदे यांनी केले.