उत्तरप्रदेशात मुसलमानाचा बनावट चकमकीत मृत्यू झाला, तर ती कारवाई करणार्‍याचाही तसाच शेवट होईल ! – Haji Shaukat Ali

ए.आय.एम्.आय.एम्. उत्तरप्रदेश अध्यक्ष हाजी शौकत अली यांचे वादग्रस्त विधान !

(ए.आय.एम्.आय.एम्. म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ)

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील ईद मिलन कार्यक्रमात सहभागी झालेल्या ए.आय.एम्.आय.एम्.चे प्रदेशाध्यक्ष हाजी शौकत अली यांनी जनतेला संबोधित करतांना म्हटले की, तुम्ही मला १११ नव्हे, केवळ ११ आमदार उत्तरप्रदेशातून द्या. मी तुम्हाला वचन देतो की, उत्तरप्रदेशात एखाद्या मुसलमानाचा बनावट चकमकीत मृत्यू झाला, तर ती कारवाई करणार्‍याचाही तसाच शेवट होईल.

मशीद आणि मदरसे यांच्या संरक्षणाचे आवाहन

शौकत अली यांनी समर्थकांना आवाहन करतांना म्हटले की, मशीद आणि मदरसे यांचे संरक्षण करायचे असेल, तर ‘एक ध्वज, एक काठी आणि एक नेता’ या तत्त्वाखाली एकत्र येणे आवश्यक असून आपल्याला विधानसभेपर्यंत पोच निर्माण करावी लागेल.

संपादकीय भूमिका

पोलीस जर बनावट चकमक करत असतील, तर मुसलमान ते सिद्ध का करून दाखवत नाहीत ? देशात मुसलमान अल्पसंख्यांक आहेत; मात्र गुन्हेगारीत त्यांचेच सर्वाधिक प्रमाण का असते ?, याचे उत्तर शौकत अली का देत नाहीत ?