
पुणे – ‘राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानां’तर्गत (रूसा) संमत झालेला ६२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची प्रक्रियाच पुणे विद्यापिठाने राबवली नसल्याने हा निधी विनावापर राहिला आहे. हा निधी अखर्चित राहिल्यास पुढील वर्षीचा ११६ कोटी रुपयांचा निधी रहित होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप ‘विद्यापीठ व्यवस्थापन परिषदे’ने केला आहे. ‘रूसा २’ अंतर्गत संमत निधीच्या माध्यमातून विद्यापीठ, नगर उपकेंद्र, नाशिक उपकेंद्र येथे संगणक प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव होता. या अनुषंगाने ‘रूसा’ कार्यालयाने विद्यापिठाच्या स्तरावरील निविदा प्रक्रिया पूर्ण करून साहित्य खरेदीसाठी ३० कोटी रुपयांचा आराखडा २० मार्चपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. अन्यथा ३१ मार्च या दिवशी निधी रहित होईल. त्यामुळे उर्वरित निधी विद्यापिठाला खर्च करावा लागेल, असे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर यांनी विद्यापिठाच्या कारभारावर आक्षेप घेत सभात्याग केला.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !