नागरिकांनी ‘एल्.पी.जी.’ला पर्याय म्हणून ‘पी.एन्.जी.’ गॅसचा वापर करावा ! – सहकार आयुक्त दीपक तावरे

‘पी.एन्.जी.’ गॅस

पुणे – आखाती देशांतील युद्धामुळे शहरातील गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यांवर परिणाम होत आहे. ज्यामुळे नागरिकांनी ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ला (एल्.पी.जी.) पर्याय म्हणून स्वस्त, सुरक्षित आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला ‘पाईप्ड् नॅचरल गॅस’चा (पी.एन्.जी.) वापर करावा, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे. ‘सहकार आयुक्तालय’ आणि ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’च्या (एम्.एन्.जी.एल्.) संयुक्त पुढाकारातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ६ सहस्र सोसायट्यांमध्ये १०० टक्के ‘पी.एन्.जी.’ वापर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. त्या वेळी आयुक्त तावरे बोलत होते.

एम्.एन्.जी.एल्.च्या संचालिका बागेश्री मंठाळकर म्हणाल्या, ‘‘पहिल्या टप्प्यात शहरात एम्.एन्.जी.एल्.ची जोडणी असलेल्या सोसायट्यांतील २ लाख घरांमध्ये ‘पी.एन्.जी.’चा वापर चालू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे घरटी २ सिलिंडरची बचत होईल. त्याचा लाभ सामान्य नागरिकांना मिळेल.’’

संपादकीय भूमिका

गॅस सिलिंडरचा वाढलेला तुटवडा आणि त्याचे परिणाम ही आपत्काळाची झलक !