
पिंपरी (पुणे) – अशोक खरातसारख्या भोंदू बाबांमुळे हिंदु धर्माचे नाव खराब केले जात आहे. असे भोंदू हिंदु समाजात अपवाद म्हणून कुठेतरी दिसून येतात. सरकार सर्व पीडित महिलांच्या समवेत आहे. खरात याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले. ते चिंचवड येथील संभाजीनगर येथे विराट हिंदु संमेलनाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मंत्री राणे म्हणाले की, पीडित महिलांनी सरकारशी संपर्क साधावा. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्या पाठीशी मुख्यमंत्री फडणवीस खंबीरपणे उभे आहेत. मला कुणाकडूनही लक्ष्य केले जात नाही. सामाजिक माध्यमांवर सगळ्याच प्रकारचे लोक असतात. त्यामुळे मी त्यांचा विचार करत नाही. मुसलमान समाजाविषयी काही झाले, तर कोण बिळात बसतात, हे आम्हालाही माहीत आहे. केवळ हिंदु धर्माची अपकीर्ती करणार्या काही लोकांना फार गुदगुल्या होत आहेत.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा