महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्यांना मतदानापासून अडवल्याचे विधीमंडळात पडसाद !

मुंबई – सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या वादाचे पडसाद २३ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. ‘मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे, ही लोकशाहीची हत्या आहे’, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याच प्रकरणात विधान परिषदेत उपसभापती नीलम गोर्हे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबित केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या २ सदस्यांवर जुन्या प्रकरणावरून गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आणि त्यांना मतदानापासूनही वंचित ठेवण्यात आले. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही पोलिसांनी हटकले. हा सर्व प्रकार विधानसभेत सांगतांना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मी पक्षाचा प्रतोद म्हणून निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्यांना पक्षादेश देण्यासाठी उपस्थित असतांना पोलिसांनी मला अडवले. एखाद्या आरोपीप्रमाणे मला आणि सदस्यांना फरफटत नेण्यात आले. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेनेकडे ३३ सदस्य होते. ही संख्या न्यून करण्यासाठी पोलिसांनी आम्हाला अडवले.’’
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवू नका, असे मी तुषार दोषी यांना दूरभाषवरून सांगितले. पोलीस महासंचालकांनाही दूरभाष करून याविषयी सांगितले. त्यावर त्यांनी सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवणार नसल्याचे सांगितले; परंतु त्यानंतरही सदस्यांना मतदान करण्यास दिले नाही.’’
विधान परिषदेत भाजप-शिवसेना यांच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी !
या प्रकरणावरून विधान परिषदेत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या खडाजंगी झाली. जयकुमार गोरे यांनी निवडणूक चालू असतांना मंत्र्यांना आतमध्ये कसे सोडण्यात आले ? या वेळी दमदाटी कुणी केली ? याचेही अन्वेषण करण्यात यावे. या वेळी उपसभापती नीलम गोर्हे यांनी मंत्र्यांना झालेली दुखापत आणि सदस्यांना मतदानापासून रोखणे गंभीर असल्याचे नमूद केले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव