
सांगली – राज्यात गोरक्षा, गोसंवर्धन आणि गोआधारित कृषीकर्म या उद्देशाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आद्यगोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा समिती महाराष्ट्र राज्य’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
या संदर्भात गोरक्षक श्री. अंकुश गोडसे म्हणाले, ‘‘भाकड आणि निराधार गोवंशियांना संरक्षण देणे, गोशाळांची स्थापना आणि व्यवस्थापन करणे, पंचगव्य आधारित उत्पादने सिद्ध करणे आणि प्रचार, गोशाळांना चारा, औषध आणि सेवा उपलब्ध करून देणे, अशी काही उद्दिष्टे या संस्थेची आहेत. या संस्थेची रचना राज्यप्रमुख, राज्य कार्यकारिणी, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, गावप्रमुख, धारकरी स्वयंसेवक अशी असणार आहे.’’
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !