‘इराणवर इतके प्रेम असेल, तर तेथे निघून जा’, असे सांगत असीम मुनीर यांनी शिया मौलानांना फटकारले
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

इस्लामाबाद – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील परिस्थिती झपाट्याने पालटत असून शिया नेत्यांनी पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. १९ मार्च या दिवशी झालेल्या उच्चस्तरीय इफ्तार समारंभात सैन्यदलप्रमुखांनी शिया मौलानांचा अवमान केल्याचा आरोप आहे. ‘तुमचे इराणवर इतके प्रेम असेल, तर तिथेच निघून जा’, असे मुनीर यांनी सांगितल्याचे पाकिस्तानचे शिया धर्मगुरु महंमद शिफा नजफी यांनी सांगितले.
१. याविषयीच्या एका वृत्तानुसार इफ्तार समारंभात सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांनी देशातील अग्रगण्य शिया उलेमांना (धर्मज्ञानींना) सर्वांसमोर कठोर शब्दांत फटकारले.
२. या घटनेनंतर पाकिस्तानातील शिया समुदायाने तीव्र अपमान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. मौलाना हसनैन अब्बास गर्देजी यांनी म्हटले की, जनरल असीम मुनीर यांचा बोलण्याचा सूर आणि टिपणी अत्यंत अवमानकारक होती.
३. कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या शिया नेत्यांनी सांगितले की, असीम मुनीर सर्वांसमोर त्यांचा अपमान करत होते आणि वारंवार त्यांना ‘इराणचे निष्ठावान’ असे संबोधत होते.
४. असीम मुनीर यांनी शिया मुसलमानांना पाकिस्तानविरोधी ठरवून देशाशी विश्वासघात केल्याचा आरोप केला.
५. असीम मुनीर यांनी दिलेली वागणूक पाकिस्तानच्या निर्मितीत शिया समुदायाचा असलेला वाटा पूर्णपणे नाकारते, असे मौलाना हसनैन यांनी सांगितले.
६. पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिन्ना शिया समुदायाचे होते. तसेच मक्का, मदिना, इराक आणि इराण येथील पवित्र स्थळांशी शियांचे शतकानुशतके असलेले धार्मिक नाते पाकिस्तानची सेना दुर्लक्षित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संपादकीय भूमिकासुन्नीबहुल पाकिस्तानमध्ये शिया मुसलमानांची बिकट स्थिती ! जगभरात जात्यंध मुसलमान एकमेकांत लढून रक्त सांडतात, ही वस्तूस्थिती आहे. मुसलमानांमध्ये जाती-जातींत पराकोटीचा द्वेष असतांना हिंदूंना ‘तुमच्या धर्मात जातीव्यवस्था आहे’, असे सांगून सुधारणावाद्यांनी हिणवणे, हे संतापजनक ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !