छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक विधाने करणारे जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करण्याची मागणी

कोल्हापूर येथे नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १९ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने अपमानजनक विधाने करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करावी आणि धार्मिक भावना दुखावल्याविषयी, तसेच चुकीचा इतिहास पसरवल्याविषयी त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे श्री. रामभाऊ मेथे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, भाजपचे एस्.बी. देवणे, हिंदु महासभा शहराध्यक्षा पूजा शिंदे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रकाश घाटगे, शशिकांत बीडकर, दीपक हारूगडे उपस्थित होते.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांनाही हे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, धर्मप्रेमी सर्वश्री महेश चव्हाण, अभिजित कोडग, नितीन राक्षे उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?