२ ते ९ अंशांपर्यंत खाली गेले तापमान

शिमला/देहराडून/लक्ष्मणपुरी/भोपाळ/कोहिमा – उत्तर, तसेच ईशान्य भारतातील हवामान अचानक पालटले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, देहली, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये पावसासमवेत गारपीट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वत्र ढग दाटून आले आहेत. सोसाट्याच्या थंड वार्यामुळे तापमान २ ते ९ अंशांपर्यंत खाली आले आहे. हरियाणातील रेवाडीत १८ मार्चच्या रात्री झालेल्या जोरदार पावसासमवेत गारपीट झाली. रस्त्यांवर पाणी साचले.
हिमाचल प्रदेशात गारपिटीची शक्यता
हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, वादळ, वीज कोसळणे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडामध्ये बर्फवृष्टी

राज्यामधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग आणि पिथौरागड यांच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली.
मध्यप्रदेशातील स्थिती
राज्यातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर यांसह ३३ जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह पाऊस पडला. ३ जिल्ह्यांमध्ये गारपिटीची चेतावणीही देण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ३० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वहाण्याचा अनुमान वर्तवला आहे.
नागालँडमध्ये वादळी पाऊस
नागालँड राज्यात जोरदार वादळ आणि पाऊस यांमुळे ४६ कुटुंबांना फटका बसला. चुमौकेडिमा आणि पेरेन जिल्ह्यांमध्ये अनेक घरे अन् विजेचे खांब खराब झाले आहेत. मोन जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचीही हानी झाली.
पुढील २ दिवस बहुतेक ठिकाणी येणार वादळ अथवा पाऊस
२० आणि २१ मार्च या दिवशी हवामान विभागाने राजधानी देहलीत हलका पाऊस आणि सोसाट्याच्या वार्याचा अनुमान वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या दक्षिण भारतातील राज्यांतही वादळाचा इशारा आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !