आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

छत्रपती संभाजीनगर, १८ मार्च (वार्ता.) – शहरातील पिसादेवी परिसरातील पळशी रोड, ‘श्रीराम पेट्रोलपंपा’च्या मागे असलेल्या कै. द्रौपदाबाई नानाभाऊ काळे क्रीडा संकुल मैदानावर १९ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने १७ मार्च या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहनफेरीला ह.भ.प. अरुण पिंपळे महाराज आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून प्रारंभ करण्यात आला. पूजाविधी श्री. प्रकाश जातेगावकरगुरुजी यांनी केला. मार्गातील अनेक ठिकाणी फेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
हिंदु-राष्ट्र जागृती सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी केले आहे.
भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने १७ मार्च ते १९ मार्च पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत भव्य शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धात वापरली जाणारी विविध शस्त्रे, शिवकालीन नाणी, त्या काळातील पत्रे आदी ऐतिहासिक वस्तूंचे दर्शन घडणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि श्री. सुदाम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाहन फेरीचा मार्ग
(आरंभ) हरसिद्धी माता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (हर्सूल), महाराज चौक, श्री. विजय औताडे यांच्या ऑफिस समोरून, तुळजाभवानी चौक, एस्.बी.ओ.ए शाळा, बाजार समिती, पिसादेवी रोड सनी सेंटर, पिसादेवी रोड नारेगाव फाटा, तेजल सृष्टी, पिसादेवी मंदिर (समारोप)
समारोप प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या नाशिक जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !