मुंबई – ‘केडी – द डेव्हिल’ या चित्रपटात संजय दत्त आणि नोरा फतेही या कलाकारांवर चित्रीत केलेले ‘सरके चुनर तेरी’ या गाण्याला समाजमाध्यमांतून अनेक स्तरांतून विरोध झाल्याने आणि त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने अंतिमतः ते यू-ट्यूबसह अन्य डिजिटल माध्यमांतून हटवण्यात आले आहे. या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही नोटीस बजावली होती.
१. या संदर्भात अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रणावत यांनीही ‘बॉलीवूडने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा सामुग्रीवर कठोर कारवाई आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
२. या गाण्याविषयी वाद निर्माण झाल्यानंतर अधिवक्ता विनीत जिंदल यांनी ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ म्हणजे केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळ, तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारीत ‘हे गाणे अत्यंत अश्लील आणि लैंगिक संकेतांनी भरलेले आहे’, असे म्हटले होते.
३. अनेक वलयांकीत व्यक्ती आणि गायक यांनीही या गाण्यातील आशयावर टीका केली होती. निर्मात्यांकडून या संपूर्ण वादावर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. हा चित्रपट वर्ष १९७० च्या दशकातील पार्श्वभूमीवर आधारित आहे. ३० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संपादकीय भूमिकाचित्रपटातील सर्वच प्रकारची अश्लीलता ही भावी पिढी आणि समाज यांच्यावर विकृत परिणाम करते. त्यामुळे मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचार वाढतात, हे अनेक उदाहरणांतून समोर आले आहे. हे वास्तव असतांना चित्रपटातील अश्लील सामुग्रीवर कडक बंधने आणणेच आवश्यक आहे ! |

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !