१ लाख ९० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात

पुणे – कदमवाकवस्ती, तालुका हवेली येथील पानाच्या दुकानात अमली पदार्थमिश्रित पानाची विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी ‘पथक क्रमांक २’ने १३ मार्च या दिवशी सायंकाळी ‘मैफिल पान शॉप’वर धाड घातली. या धाडीत अमली पदार्थमिश्रीत २६६.४ ग्रॅम पान, भ्रमणभाषसंच आणि इतर साहित्य असा १ लाख ९० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे. दुकानमालक निशांत काळभोर आणि कामगार रामजी पटेल यांना अटक करण्यात आली असून रोहित जवळकर हा आरोपी पसार झाला आहे. पोलीस अन्वेषणात खाण्याच्या पानात ‘अँफेटामाईन’, ‘बेंझोडायझेपाइंस’, ‘ओपिएटस’ आणि ‘मेथांफेटामाईन’ या धोकादायक अमली पदार्थांचे मिश्रण आढळून आले आहे. ३५ रुपयांत मिळणार्या एका पानाची नशा मद्याच्या एका बाटलीइतकी भीषण आहे. हवेली परिसरात २०० हून अधिक ठिकाणी या पानाची विक्री केली जात असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या पानाचे सेवन करत आहेत. ही कारवाई पुष्कळ विलंबाने झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाज्या नागरिकांना ही माहिती होती, त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक होते, तसेच नागरिकांना मिळणारी माहिती पोलिसांना का मिळत नाही ? |
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !