
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – अनधिकृत आणि विनानोंदणी चालू असलेल्या ‘नर्सिंग होम’वर (लघु रुग्णालये) कारवाई करण्यासाठी ‘विशेष कृती दल’ (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी १६ मार्च या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात दिली.
डॉ. उदय सामंत म्हणाले की,
१. महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम १९४९, तसेच संबंधित नियमांनुसार राज्यात खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम यांची नोंदणी अन् पडताळणी केली जाते; मात्र काही ठिकाणी विनानोंदणी किंवा अनधिकृत ‘नर्सिंग होम’ चालू असल्याच्या तक्रारी येत असल्याने या प्रकरणावर राज्यस्तरावर समन्वयाने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
२. यासाठी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव यांच्या सहअध्यक्षतेखाली ‘विशेष समिती’ गठीत करण्यात येणार आहे.
३. या समितीत विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी, तसेच आवश्यक ते इतर अधिकारीही सहभागी असतील.
४. ही समिती राज्यातील सर्व ‘नर्सिंग होम’चा आढावा घेऊन अनधिकृत ‘नर्सिंग होम’वर कारवाई करेल आणि संपूर्ण अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर मांडेल.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !