
पुणे – स्वारगेट (पुणे) हे मुख्य वाहतुकीचे केंद्र असून येथे एस्.टी. बसस्थानक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पी.एम्.पी.एल्.) स्थानक आणि मेट्रोस्थानक यांमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ असते; मात्र ‘नो पार्किंग’ (वाहने उभी करू नयेत) आणि ‘नो हॉल्टिंग’ (वाहने काही वेळासाठीही उभी न करणे) क्षेत्रात रिक्शांच्या रांगा, वाहनात जादा प्रवासी भरणे, रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करणे यांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर २ दिवस (१० आणि १२ मार्च) स्वारगेट वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) यांनी संयुक्त कारवाई केली. जेधे चौक, बसस्थानक आत जाण्याचा-बाहेर पडण्याचा मार्ग, महामेट्रो परिसराची नाकेबंदी करून विशेष मोहीम राबवली. या संयुक्त कारवाईत ३७५ रिक्शाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदोष १० रिक्शा कह्यात घेण्यात आल्या आहेत.
१० मार्चला १४६ रिक्शाचालकांवर कारवाई केली. यात १११ जणांवर जादा प्रवासी भरणे, ३२ जणांवर भाडे नाकारण्यासाठी आणि ३ सदोष रिक्शा कह्यात घेण्यात आल्या.
१२ मार्चला १८६ जणांवर वाहतूक विभागाने आणि ४३ जणांवर ‘आर्.टी.ओ.’ ने कारवाई केली. यात ४८ जणांवर गणवेश नसणे, १८ जणांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, २१ जणांवर भाडे नाकारणे, ९२ जणांवर जादा प्रवासी भरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली, तसेच ७ सदोष रिक्शा कह्यात घेण्यात आल्या. चौकात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही मोहीम यापुढेही राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संपादकीय भूमिका :आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! कधीतरी कारवाई करून जनतेला शिस्त लागणार नसून सतत त्यावर लक्ष ठेवणे आणि नियम मोडणार्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !