|

पुणे – हडपसर येथील काळेबोराटेनगर भागात ५ एप्रिलला होणार्या ऐतिहासिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार उत्साहात चालू आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा हुंकार घुमणार असून सभेचा संदेश घराघरात पोचवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी मोठ्या उत्साहाने सिद्ध झाले आहेत. प्रसाराच्या निमित्त गावोगावी बैठका घेणे, बलीदान मासनिमित्त चालू असलेल्या बैठकांमधून प्रसार करणे, लोकप्रतिनिधींना निमंत्रणे देण्ो, तसेच अन्य धर्मप्रेमींच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन सभेच्या प्रसाराला व्यापक स्वरूप दिले जात आहे. भाजपचे आमदार श्री. योगेश अण्णा टिळेकर यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. सामाजिक प्रसारमाध्यमासमवेतच भित्तीपत्रके लावणे आणि हस्तपत्रके देणे आदी सेवांनाही वेग आला आहे.

संतांचे आशीर्वाद !
सभेच्या यशस्वीतेसाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी तीर्थक्षेत्र रामदरा येथील महाराजांचे आशीर्वाद घेण्यात आले, तसेच श्री रामरायाच्या चरणी ही सभा त्याला अपेक्षित अशीच व्हावी, यासाठी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली.
लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सभेच्या निमंत्रणासाठी विविध क्षेत्रांतील पुढील मान्यवरांच्या भेटी घेतल्या.
१. भाजपचे आमदार श्री. योगेश अण्णा टिळेकर यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले, तसेच भाजपचे श्री. बाळासाहेब घुले, शिवसेनचे पुरंदर तालुका समन्वयक श्री. समीर जाधव, शिवसेना नगरसेवक श्री. पिंटू तात्या हरपळे, श्री. गणेश कामथे, भाजपचे श्री. किरण जाधव आणि श्री. नाना भानगिरे यांचे स्वीय सचिव श्री. प्रकाश कालगुडे यांनाही निमंत्रण देण्यात आले. सर्व मान्यवरांनी सभेला येण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
२. सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील धर्मप्रेमींनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या अंतर्गत ‘अहिल्यादेवी सेवा समिती’च्या अध्यक्षा सौ. संध्या वेदपाठक, विशाल वेदपाठक आणि शिवप्रतिष्ठानचे श्री. राज कामथे यांनी सभेला सक्रीय पाठिंबा दर्शवला आहे, तसेच सामाजिक आणि अन्य क्षेत्रांतील धर्मप्रेमीही या सभेत सक्रीय सहभाग घेणार आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनाही निमंत्रण दिले.
३. प्रसारानिमित्त ठिकठिकाणी दिलेल्या भेटीमध्ये विविध व्यावसायिकांनी सभेच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.

गावोगावी बैठका आणि ‘बलीदान मास’निमित्त प्रसार !

१. दौंड, पारगाव, बारामती, शिंदेवाडी, पिंपळगाव आदी ठिकाणी बैठका आणि प्रसार केला जात आहे. काही ठिकाणी ‘बलीदान मास’निमित्त आयोजित केलेल्या बैठकीतही सभेचा प्रसार केला जात आहे. त्या अंतर्गत नायगाव आणि पांडवदंड येथे बलीदान मासानिमित्त आयोजित व्याख्यानांमध्ये सभेचे निमंत्रण देण्यात आले. पांडवदंड येथे ४५ धर्मप्रेमींनी सभेला उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवली.
२. थेऊर येथे गोरक्षकांची बैठक पार पडली, तर लोणी-खोले वस्ती आणि फुरसुंगी येथे शिववंदना अन् बलीदान मास कार्यक्रमानंतर सभेचा प्रसार करण्यात आला. गोरक्षणाचे कार्य तळमळीने करणारे श्री. ऋषिकेश कामथे यांच्या माध्यमातून हडपसर पंचक्रोशीतील १५ पेक्षा अधिक बलीदान मासामधे विषय मांडण्यात आला.
३. उंड्री येथील विठ्ठल मंदिर आणि भैरवनाथ मंदिराच्या विश्वस्तांनी युवकांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. शिंदेवाडी पारगाव येथे उपसरपंच श्री. बाजीराव तांबे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार, असे सांगितले.
सामाजिक, तसेच अन्य माध्यमे यांतून सभेचा प्रचार वेगात !
या सेवेत धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. गंगानगर आणि वाघळवाडी शाखेतील धर्मप्रेमींनी ‘प्रत्येकी १० जणांना समवेत आणू’, असे सांगितले. नवनाथ लांडगे यांच्या माध्यमातून ५०० हून अधिक लोकांपर्यंत पोचण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. ठिकठिकाणी झालेल्या बैठकांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने धर्मप्रेमी सभेला उपस्थित रहाणार आहेत.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !