‘डिप्लोमा इन थेरपटिक म्युझिक’चा ‘दीक्षांत समारंभ’

पुणे, १३ मार्च (वार्ता.) – ‘सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट’कडून संगीत उपचारांवर एक दिवसाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील ‘श्रमिक पत्रकार संघा’च्या सभागृहात २२ मार्च या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे चर्चासत्र पार पडत आहे, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक डॉ. शशांक कट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. डॉ. कट्टी म्हणाले, ‘‘या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या चर्चासत्रात डॉ. शशांक कट्टी, आधुनिक वैद्य मिलिंद भोई, एन्.पी. देशपांडे, आधुनिक वैद्य यश वेलणकर, आधुनिक वैद्य श्रीधर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होणार आहे.’’ या चर्चासत्रामध्ये ‘डिप्लोमा इन थेर्पेटिक म्युझिक’ हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षांत समारंभ’ होणार आहे. ज्येष्ठ ध्रुपद गायक पंडित उदय भवाळकर यांचे गायन होणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री