
फरीदाबाद (हरियाणा) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सेक्टर ८२ मधील ‘स्वरूप गार्डन’, सेक्टर ११ डीमधील ‘सर छोटू राम पार्क’ आणि सेक्टर २१ एमधील ‘श्री राम मॉडेल स्कूल’ येथे हिंदु अधिवेशनाचे आयोजन केले होते. या अधिवेशनाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

क्षणचित्रे
१. सनातन संस्थेचे एक हितचिंतक श्री. रवी दुबे यांनी वैयक्तिकरित्या सनातन संस्थेला या अधिवेशनात प्रदर्शन लावण्यासाठी आमंत्रित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतर सदस्यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
२. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून ग्रंथ अन् साहित्य खरेदी केली, तसेच अनेकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीही अनेकांना सनातन संस्थेची उत्पादने खरेदी करण्याविषयी सांगितले, तसेच त्यांनी त्या उत्पादनांची माहिती देऊन अभ्यागतांना ते खरेदी करण्यास प्रोत्साहित केले.
सिंहस्थ कुंभपर्वासाठी नाशिक येथे तात्पुरते उपजिल्हाधिकारी नेमणार !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
श्री सत्यसाईबाबांच्या रथासह चरण पादुकांचा नगर शहरासह उपनगरांत विहार
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !