भाग्यनगर पोलिसांनी जप्त केला विषारी माल !

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाग्यनगर पोलिसांनी मल्लेपल्ली परिसरात मोठी कारवाई करत भेसळयुक्त अदरक-लसूणचे वाटण (पेस्ट) सिद्ध करणार्या ‘शहजादा फूड मास्टर’ या आस्थापनावर नुकतीच धाड घातली. पोलिसांनी घटनास्थळावरून १ सहस्र ९० किलो भेसळयुक्त वाटण आणि ८७५ किलो विषारी कच्चा माल जप्त केला. या मालाची किंमत २ लाख २ सहस्र रुपये असल्याचे सांगितले जाते. या धाडीत आस्थापनाचा मालक महंमद फारूक (वय ५० वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. ही पेस्ट अत्यंत अस्वच्छ वातावरणात, धूळ आणि माश्या, अशा स्थितीत उघड्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये सिद्ध केली जात होती, असे पहाणीत आढळून आले आहे. (एरव्ही अल्पसंख्याक असलेले मुसलमान अवैध धंदे असो किंवा अवैध कारवाया यामध्ये बहुसंख्येने आढळतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
अदरक-लसूणचे वाटण घट्ट आणि चमकदार दिसावे, यासाठी त्यामध्ये ‘अॅसिटिक अॅसिड’, कृत्रिम अन्नरंग, गम पावडर (गोंद) आणि पिष्टमय पदार्थ (स्टार्च) यांचा वापर केला जात होता. पोलिसांच्या माहितीनुसार, या आस्थापनाचा ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया’चा परवाना २०१८ मध्येच संपुष्टात आला होता. आरोपी अवैध कमाई वाढवण्यासाठी हे विषारी वाटण भाग्यनगरमधील मोठ्या किराणा दुकाने, हॉटेल आणि खानावळी यांना पुरवत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !