सर्व संकेतस्थळे सायबर फसवणुकीसाठीच

पणजी, ११ मार्च (वार्ता.) – गोव्यात वेश्याव्यवसायाविषयी विज्ञापने देणारी सर्व संकेतस्थळे ही प्रामुख्याने सायबर फसवणुकीसाठीच चालू केलेली असतात आणि ही सर्व संकेतस्थळे राज्याबाहेरून चालवली जातात. राज्यात वेश्याव्यवसायाचे प्रमाण मोठे असल्याचे भासवले जाते; मात्र ते तेवढे मोठे नाही, तरीही पोलीस अशा कृत्यावर कडक कारवाई करत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ११ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी दिली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘इंटरनेटवर ‘एस्कॉर्ट सर्व्हिस इन गोवा’ असा शोध (सर्च) घेतल्यास अनेक संकेतस्थळे उघडली जातात; मात्र ही सर्व बनावट आहेत. ही संकेतस्थळे बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड ही राज्ये किंवा केनियासारखे देश येथून चालवली जातात. या संकेतस्थळांवर संपर्क केल्यास आधी पैशांची मागणी केली जाते आणि पैसे मिळाल्यानंतर दिलेले संपर्क क्रमांक बंद केले जातात. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून संपर्क साधून या फसवणुकीची निश्चिती केली. गेल्या २ वर्षांत अशा प्रकारची ५१२ संकेतस्थळे बंद करण्यात आली असून २२ जणांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याखेरीज मानवी तस्करीच्या १६ प्रकरणांमध्ये ३६ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी ४२ महिलांची सुटका करण्यात आली आहे. राज्यात हरवलेल्या मुलामुलींचा शोध लागण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे.’’
| राजधानी पणजी येथे ‘१८ जून’ रस्त्यावर १८ ‘स्पा’ ! – विजय सरदेसाई, आमदार
(स्पा म्हणजे एक प्रकारची मसाज केंद्रे) विधानसभेत ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘राज्यात ‘स्पा’ प्रथा वाढत आहे. गोव्याच्या क्रांतीदिनाची आठवण म्हणून ज्या रस्त्याला ‘१८ जून मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे, तेथे आज १८ स्पा चालू झालेले आहेत. सरकारने या वाढत्या प्रमाणाची गंभीर नोंद घेणे आवश्यक आहे.’’ |
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार