गोवा विधनासभा अधिवेशन

पणजी, ११ मार्च (वार्ता.) – गोव्यात सध्या पुढील १५ दिवस पुरेल इतका एल्.पी.जी. (एल्.पी.जी. – लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस – द्रवरूप पेट्रोलियम वायू) गॅस सिलिंडरांचा साठा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील उपलब्ध साठ्याची माहिती मागवली आहे. याविषयी गोव्याचा अहवाल आजच केंद्राला पाठवण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ११ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. भाजपचे साळगावचे आमदार केदार नाईक यांनी शून्य प्रहराच्या वेळी विचारलेल्या एका प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
|
गॅस सिलिंडरांच्या पुरवठ्याविषयी लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ![]() पणजी – राज्यात घरगुती वापरासंबंधी एल्.पी.जी. गॅस सिलिंडरांचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे आणि यामुळे कुणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. व्यावसायिक स्तरावर गॅस सिलिंडर पुरवठ्याचा सध्या प्रश्न आहे. याविषयी केंद्राकडे चर्चा चालू आहे आणि समस्या लवकरच सोडवली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा संकुलाबाहेर पत्रकारांशी बोलतांना दिली. |
प्रारंभी आमदार केदार नाईक म्हणाले, ‘‘गोव्यात सध्या एल्.पी.जी. गॅस सिलिंडरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. गॅस एजन्सींना व्यावसायिक आस्थापनांना सिलिंडर न देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचा फटका लहान हॉटेल्स आणि उपाहारगृहे आदी व्यावसायिक आस्थापनांना बसत आहे. विशेषत: मासेमारीसाठी खोल समुद्रात जाणार्या ट्रॉलर आणि मोठ्या नौकांवरील कामगार यांना १० दिवस समुद्रात रहावे लागते. अशा वेळी त्यांना स्वयंपाकासाठी गॅसची मोठी आवश्यकता असते. यासाठी शासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा.’’
यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गॅस सिलिंडरच्या एजन्सींना सिलिंडर व्यावसायिक ग्राहकांना न देण्याविषयी परिपत्रक १० मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेले आहे. याविषयी मी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरे यांच्याशीही चर्चा केली आहे.’’
उपाययोजनांसाठी केंद्राकडून ३ सचिवांची समिती स्थापन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘देशातील सर्व राज्यांतील सिलिंडरच्या उपलब्ध साठ्याची माहिती घेऊन पुढील उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ सचिवांची एक समिती स्थापन केली आहे. गोव्यातील सध्याच्या साठ्याविषयीचा अहवाल या समितीला पाठवण्यात येणार आहे.’’
गोव्यात गॅस एजन्सींसमोर रांगा
प्राप्त माहितीनुसार गोव्यात गॅस सिलिंडरधारकांनाही तुटवडा जाणवू लागला आहे. ११ मार्च या दिवशी अनेक गॅस एजन्सींसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी आरक्षण करूनही सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी सिलिंडरचा पुरवठा करणार्यांना काही ग्राहकांनी वाटेवर अडवून ‘आरक्षित केलेले सिलिंडर का दिले जात नाहीत ?’, असे खडसवले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी