विधानसभा अध्यक्षांकडून गंभीर नोंद; कठोर कारवाईची चेतावणी !

मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय गंभीर विषयावर विधीमंडळात चर्चा चालू असतांना वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या अनुपस्थितीची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० मार्च या दिवशी गंभीर नोंद घेतली. ‘महत्त्वाच्या चर्चांच्या वेळी वरिष्ठ अधिकार्यांनी सभागृहात उपस्थित रहाणे अनिवार्य असून प्रशासनाने ही ताकीद ‘अंतिम संधी’ समजावी; अन्यथा कठोर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली.
राज्य अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ होण्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले की, अर्थसंकल्पावरील चर्चा हा अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक विषय आहे. या चर्चेच्या वेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या सूत्रांना उत्तर देण्यासाठी मंत्र्यांना तातडीने प्रशासकीय माहिती, सांख्यिकी आणि तांत्रिक माहिती यांची आवश्यकता असते. अशा वेळी संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित रहाणे अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या वादविवादांच्या वेळी वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याविषयी आपण यापूर्वीच प्रशासनाला लेखी पत्र लिहून कळवले होते. याची आठवणही अध्यक्षांनी करून दिली; मात्र वारंवार सांगूनही अधिकार्यांच्या वर्तणुकीत पालट होत नसल्याने त्यांनी थेट सभागृहातून ही ताकीद दिली.
संपादकीय भूमिकाविधीमंडळात अनुपस्थित रहाणार्या वरिष्ठ अधिकार्यांना पदच्युत केल्यासच शिस्त अबाधित राहील ! |
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
CBI Arrests Pradeep Kumar : हरियाणा : निवृत्तीच्या काही घंटे आधीच आय.ए.एस्. अधिकार्याला ‘सीबीआय’ कडून अटक !
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश