कलबुर्गी (कर्नाटक) – गुपचूप चालू असलेला धार्मिक धर्मांतराचा कट हिंदु कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. गावागावांत जाऊन ‘आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. रविवारी तुम्हीही आमच्यासमवेत येऊन प्रार्थना करा’ असे सांगत येशू ख्रिस्त्याच्या शिकवणुकीची पत्रके वाटून धर्मांतराचा कट रचणार्या टोळीला हिंदु कार्यकर्त्यांनी पकडले.
Conversion Attempt in Kalaburagi Foiled 🚩
A suspected conversion drive by Christian missionaries in a village of Kalaburagi (Karnataka) was foiled after alert Hindu organisations intervened.
The group was reportedly visiting villages, telling locals “We pray for you, you… pic.twitter.com/UlmkyF5ojU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 12, 2026
कलबुर्गी शहराच्या वेशीवर असलेल्या शरणसिरसगी गावाजवळ या टोळीला बजरंग दल आणि इतर हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी अडवून तीव्र संताप व्यक्त केला. पत्रके वाटणार्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करून निदर्शने करण्यात आली आहेत. ‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अलीकडच्या काळात धर्मांतराचे प्रमाण वाढत आहे. आजाराचे निमित्त करून निष्पाप लोकांची दिशाभूल केली जात आहे. सरकारने तातडीने अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी’, अशी मागणी आंदोलकांनी केली.
‘तुमच्या घरात कुणी दीर्घ आजाराने ग्रस्त असेल किंवा संकटात असेल, तर आम्हाला सांगा, आम्ही उद्या त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करू. यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील, असे आमिष ते ग्रामस्थांना दाखवत होते.
संपादकीय भूमिकादेशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचा हा परिणाम आहे ! असे आणखी किती वर्षे चालणार ?, असा प्रश्न उपस्थित होतो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |

Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी