सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात २३६ पदे रक्त

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील साहाय्यक प्राध्यापक संवर्गात ११ सहस्र ९१८ रिक्त पदांपैकी ५ सहस्र १२ पदांच्या पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील एकूण ३८४ पदांपैकी १४८ पदे भरली असून २३६ पदे रिक्त आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
१. राज्यातील १५ विद्यापिठांमध्ये २ सहस्र ६०० शिक्षकीय पदांना मान्यता आहे. त्यातील १ सहस्र ४९७ पदे रिक्त आहेत. नागपूर विद्यापीठ २०९, पुणे विद्यापीठ २३६ आणि मुंबई विद्यापीठ २३५ पदांचा समावेश आहे. १ सहस्र ४९७ पैकी ६८७ पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे.
२. सार्वजनिक विद्यापिठांमधील शैक्षणिक आणि संशोधनासाठी ६० टक्के, अध्यापन कौशल्य मूल्यांकनासाठी २० टक्के आणि मुलाखत कामगिरीसाठी २० टक्के या सुधारित तरतुदीनुसार करण्यास मान्यता दिली आहे.
३. विद्यापिठांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘नॅक’ प्रमाणपत्र (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांचे प्रमाणपत्र) देण्यात येते. त्यास सवलत देता येणार नाही. ‘नॅक’मुळे अनावश्यक स्पर्धा टाळता येते. विद्यापिठांमध्ये आवश्यक त्या सुविधा निर्माण होतात.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !