
आटपाडी (जिल्हा सांगली) – आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावामध्ये ‘हिंदु जनजागृती संघा’चा प्रथम वर्धापनदिन संघाचे संस्थापक श्री. नंदकुमार गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. पुणे-मावळ येथून श्री. चंद्रकांत गायकवाड, मुंबई-कल्याण येथून श्री. अंकुश मुळीकगुरुजी, तर खानापूर संगमेश्वर येथून श्री. उत्तमराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमप्रसंगी आयोजकांनी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्याची मागणी केली होती, तसेच कार्यक्रमप्रसंगी व्यासपिठावरून प्रदर्शनास भेट देऊन ग्रंथ विकत घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी अध्यात्मप्रसाराची सेवा करत असल्याविषयी सनातन संस्थेच्या साधिका सौ. कविता पवार आणि श्री. दत्तात्रय पवार यांचा शेटफळे गावचे ज्येष्ठ अन् आदर्श नागरिक श्री. पतंग पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !