ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची स्वीकृती

पुणे – धर्मवीर संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्कारांचा कोणत्याही ऐतिहासिक दस्तांमध्ये उल्लेख नाही. ‘संभाजी’ या कादंबरीतील उल्लेख पूर्णत: काल्पनिक असून ‘जना परीटीण’, ‘गोविंद नाक’, ‘दमाजी पाटील’, ‘पाटलीन’, असे उल्लेखही काल्पनिक असल्याची स्वीकृती ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी उलट पडताळणीमध्ये दिली. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर विश्वास पाटील यांची राज्यशासनाचे विशेष सरकारी अधिवक्ता शिशिर हिरे यांनी ६ मार्च या दिवशी उलट पडताळणी घेतली. त्या वेळी सावंत यांनी उत्तर दिले.
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘संभाजी’ या कादंबरीतील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्कारांवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांचे अंत्यसंस्कार एका विशिष्ट समाजातील व्यक्तीने केल्याची भूमिका घेण्यात आली आहे. यामुळे १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्या दंगलीच्या संदर्भात कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सुनावणी चालू आहे.
‘संभाजी ही कादंबरी भूभाग आणि काही तथ्य यांवर आधारित कल्पनाविलास आहे. कादंबरीतील लिखाणाचा अपलाभ घेत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते निषेधार्ह आहे’, असेही पाटील म्हणाले. अधिवक्ता शिशिर हिरे म्हणाले की, जेधे शकवली, मासीरे आलमगीर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांचा उल्लेख करत विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ कादंबरीतील कल्पनाविलासाचा फोलपणा कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर मांडण्यात आला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री