७४ लाख ५० सहस्र रुपयांचा गांजा

पुणे – बँकॉकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका विमानाच्या प्रसाधनगृहात लपवलेला ७४ लाख ५० सहस्र रुपयांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला. ही कारवाई सीमाशुल्क विभागाच्या पथकाने केली. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बँकॉकहून पुण्यातील विमानतळावर ३ मार्च या दिवशी विमान उतरले. विमानातून गांजाची तस्करी होणार असल्याचे सीमाशुल्क विभागाला समजले होते. प्रसाधनगृहात लपवून ठेवलेली ८ पाकिटे सापडली. त्यात ७४५ ग्रॅम ‘हायड्रोपोनिक गांजा’ आढळून आला.
परदेशातून आलेली विमाने देशांतर्गत प्रवासासाठी वापरली जात असल्याची माहिती घेऊन तस्करांनी विमानाच्या प्रसाधनगृहात गांजा लपवला. देशांतर्गत प्रवासात पडताळणी होत नसल्याने विमान दुसर्या शहरात पोचल्यानंतर तस्करांनी हा प्रयत्न केल्याची शक्यता सीमाशुल्क अधिकार्यांनी व्यक्त केली.
संपादकीय भूमिकासंस्कृतीचे माहेरघर असणारे पुणे अमली पदार्थांचा साठा होण्याचा मार्गावर जात असणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! यावर कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक ! |
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !