
सातारा, ५ मार्च (वार्ता.) – पाटण तालुक्यातील दौलतनगर (मरळी) येथे २ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘डोंगरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांना याचे दायित्व देण्यात आले आहे. योग्य समन्वय ठेवून डोंगरी महोत्सव यशस्वी करावा, असे निर्देश पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण येथील विश्रामगृहात आयोजित ‘डोंगरी महोत्सवा’च्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘या महोत्सवामध्ये भजन, गायन, वादन, पोवाडे लोककलांचे सादरीकरण, नृत्य स्पर्धा होणार आहेत. महोत्सवाच्या मुख्य मैदानासह कृषी, पशूपक्षी आणि महिला बचत गटांचे प्रदर्शन अन् विक्री मेळावा यांचेही आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी प्रांताधिकार्यांनी समन्वयक नेमावेत. महोत्सव काळात मरळी भाग परिसर स्वच्छ राहील यावर भर द्यावा. पोलीस दलानेही चोख बंदोबस्त ठेवावा. महोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित रहाणार असल्यामुळे अधिकच्या एस्.टी. बसगाड्या सोडण्यात याव्यात.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात