
नवी मुंबई – नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारामध्ये ५० किलोपर्यंतची गोणी उचलण्यावर माथाडी कामगार ठाम आहेत. परिणामी आजही अनेक व्यापार्यांकडील कांदा-बटाटा उतरवला गेला नाही. कांदा-बटाटा यांची आवक निम्म्यावर आली आहे. कांदा-बटाट्याची नियमित आवक २०० ते २२५ गाड्या असते; मात्र मागील दोन दिवसांत ८५ ते ९० गाड्याच आवक बाजार आवारात झाली आहे.
‘महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’ने नियमाप्रमाणे ‘कृषीमालाच्या गोणीचे वजन ५० किलो असावे’, अशी मागणी लावून धरली आहे. यापूर्वी याविषयी प्रशासन आणि व्यापारी संघटना यांकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे २ मार्चपासून ५० किलोंपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची चढ-उतार करणे बंद केले. ५० किलोंपर्यंत वजन असलेल्या गोण्या उतरवल्या.
‘कांदा-बटाटा आडत व्यापारी संघा’चे अध्यक्ष संजय पिंगळे यांनी सांगितले की, माथाडी कामगारांच्या मागणीशी आम्ही सहमत आहोत. असे असले, तरी राज्यातील ३५० बाजार समित्यांमध्ये आधी हा नियम लागू करावा. मग नवी मुंबई बाजार समितीमध्ये लागू करावा. तसेच शासनाने गोणी उत्पादन करणार्या उद्योजकांना ५० किलोच्या गोणी ऐवजी ४८ किलोची गोणी करण्याचे आदेश द्यावेत. पण मंत्र्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून या नियमाच्या कार्यवाहीसाठी २ महिने अवधी द्यावा; जेणेकरून मुंबईचा पुरवठा थांबणार नाही. कांदा-बटाटा बाजारामधून मुंबई आणि उपनगरे येथे २०० ते २२५ गाड्या कांदा आणि बटाटा जातो, तो निम्म्यावर आला आहे. ‘पनवेल, कल्याण, ठाणे येथे ५५ ते ६० किलोच्या गोणी भरल्या जातात; मग आमच्याच बाजाराला हा नियम का लावला जात आहे ?’, असा प्रश्न व्यापार्यांनी उपस्थित केला आहे. ३ दिवसांपासून आवक अर्ध्यावर आल्याने कांदा आणि बटाटा यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. लवकरच यावर तोडगा निघाला नाही, तर भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक