देवस्थानने लक्ष देण्याची आवश्यकता

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात श्री देवीचे दर्शन हे विनामूल्य असून येथे ‘पेड दर्शन’ (पैसे देऊन दर्शन घेणे) ही व्यवस्था नाही. सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रत्येक शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी ४० ते ५० सहस्र भाविक दर्शनासाठी येतात. सलग सुट्या असतील, तर यापेक्षा संख्या वाढते. यामुळे प्रत्यक्ष दर्शनासाठी २ – ३ घंटे लागतात. याचा अपलाभ उठवत मंदिर परिसरात पैसे घेऊन देवीचे दर्शन देणार्या काही व्यक्तींची यंत्रणा कार्यरत आहे. या व्यक्ती भाविकांना हेरून त्यांच्याकडून पैसे घेऊन दर्शन घडवून आणत आहेत. या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थानने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात देवस्थान समितीच्या सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.
ज्या भाविकांना लवकर दर्शन हवे असते, अशा भाविकांना ५०० रुपये, १ सहस्र रुपये घेऊन दर्शन घडवून देणार्या काही यंत्रणा कार्यरत आहेत. देवीचे मुखदर्शन महाद्वार रस्त्यावरून होऊ शकते; मात्र येथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते दर्शन आता अवघड झाले आहे. त्यामुळेही अडचणी येत आहेत. याचसमवेत बाहेरगावाहून येणार्या भाविकांना सहज उपलब्ध होईल, असे चारचाकी वाहनतळ उपलब्ध होत नसून त्यांना अव्वाच्या-सव्वा रक्कम देऊन गाड्या लावाव्या लागत आहेत. महापालिका आणि मंदिर प्रशासन यांच्या वतीने चालू असलेले बहुमजली वाहनतळ अद्याप कार्यरत नसल्याचा फटका भाविकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
संपादकीय भूमिका
|
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !