|
पुरी (ओडिशा) – पुरी येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिरातील भगवान श्री जगन्नाथाच्या रत्न भंडारातील आभूषणांची मोजणी आणि सूची बनवण्याची प्रक्रिया २५ मार्चपासून चालू होणार आहे. ओडिशा सरकारने या मोजणीसाठी चैत्र शुक्ल सप्तमी, म्हणजेच २५ मार्चला दुपारी १२.१२ ते १.४५ वाजेपर्यंतचा शुभमुहूर्त निश्चित केला आहे, म्हणजे या वेळेपासून मोजणी चालू होईल आणि ती पुढे बराच कालावधी चालेल. यापूर्वी वर्ष १९७८ मध्ये रत्न भंडारातील आभूषणांची मोजणी झाली होती. ती तब्बल ७२ दिवस चालली होती. या संपूर्ण मोजणी प्रक्रियेचे छायाचित्रण, तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. या वेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे २ वरिष्ठ अधिकारी, तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचे नोंदणीकृत सराफही उपस्थित रहाणार आहेत.
याविषयी माहिती मुख्य प्रशासक अरविंद पाढी म्हणाले की, ही मोजणी किती दिवस चालेल ?, हे आताच सांगणे कठीण आहे. कोणकोणत्या दिवशी भंडारातील आभूषणांची गणती होईल ?, याचे स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. राज्य सरकार दोन रत्नवैज्ञानिकही उपलब्ध करून देणार आहे. मौल्यवान रत्नांची ते ओळख पटवतील. बाहेरील रत्न भंडारात भगवान श्री जगन्नाथाच्या दैनंदिन वापराची आभूषणे ठेवली जातात. ती सर्वांत आधी काढून मोजली जातील. त्यानंतर आतील रत्न भंडार उघडले जाईल.
मोजणीच्या कालावधीत दंडाधिकारी प्रतिदिन रत्न भंडाराची किल्ली आणून मोजणीनंतर ती त्याच दिवशी जमा करणार !
दागिन्यांच्या मोजणीसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक प्रणाली प्रसिद्ध केली आहे. ३ सदस्यीय समिती या संपूर्ण प्रक्रियेची देखरेख करेल. सोने, चांदी आणि इतर मौल्यवान आभूषणांसाठी वेगवेगळी खोकी असतील. १० जण आभूषणे खोक्यांमध्ये सुरक्षित ठेवतील. दंडाधिकारी प्रतिदिन रत्न भंडाराची किल्ली घेऊन येतील आणि त्या दिवशीची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच दिवशी ती किल्ली जमा करतील. शनिवार, रविवार आणि सण-उत्सवाच्या दिवशी भाविकांच्या गर्दीमुळे त्या दिवसांमध्ये ही मोजणी केली जाणार नाही. ओडिशा उच्च न्यायालयाने ही मोजणी ३ मासांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र ही समयमर्यादा वाढून देण्याची विनंती केली जाऊ शकते.
४८ वर्षांपूर्वी होते १२८ किलो सोने आणि २२१ किलो चांदी !
‘रत्न भंडार’ हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मौल्यवान आभूषणांचा प्राचिन खजिना आहे. हे मंदिर जगमोहन (सभा कक्ष) उत्तर दिशेला आहे. वर्ष १९७८ मध्ये झालेल्या गणतीनुसार येथे १२८.३८ किलोग्राम सोने आणि २२१.५३ किलोग्राम चांदीची आभूषणे आहेत. त्यात हिरे, तसेच अन्य दागिने यांचाही समावेश आहे. १४ जुलै २०२४ या दिवशी ४६ वर्षानंतर रत्न भंडार डागडुजीसाठी उघडण्यात आले होते. आता मौल्यवान आभूषणे पुन्हा मूळ भंडारात ठेवण्यात येणार आहेत.

श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !