जळगाव येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा चैतन्यमय वातावरणात साजरा !

जळगाव, १ मार्च (वार्ता.) – ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हा शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पहिल्या पृष्ठावर आहे. व्रतस्थ कसा ओळखायचा ? याविषयी चिंतन होण्याची आवश्यकता आहे. व्रतस्थाचे वर्तन कसे असावे ? तर एका विद्यार्थ्यासारखे ! जीवनाच्या अंतापर्यंत प्रत्येकाने विद्यार्थीदशेतच जगावे. विद्यार्थ्याकडे ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, अध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्त्वाकांक्षा या ५ गुणांची आवश्यकता आहे. हे गुण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तंतोतंत आढळतात. उद्यम (दीर्घोद्योगी), साहस (स्वतः संकटात राहून दुसर्याचा जीव वाचवणे), धैर्य (आपल्यावर आलेल्या संकटाला सामोरे जाणे), बुद्धी, शक्ती, पराक्रम हे गुण व्रतस्थाला प्राप्त होतात. हेच गुण अर्जुनातही होते. ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आहेत. ‘सनातन प्रभात’ असा भक्त आहे की, जो जिवाची पर्वा करत नाही; म्हणूनच ‘न मे भक्त प्रणश्यति ।’, (अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही) हा श्लोक ‘सनातन प्रभात’साठी सार्थ ठरतो, असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंत श्री. दुर्गेश परुळकर यांनी काढले. येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा चैतन्यमय वातावरणात साजरा झाला. या वेळी ते बोलत होते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन श्री. उदय बडगुजर यांनी केले. या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईची सेवा करणार्या श्री. शुभम् लोंकलकर आणि श्री. संजय तायडे यांचा श्री. दुर्गेश परुळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री. परेश महाराज यांनी केलेल्या शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्री. दुर्गेश परुळकर यांचे स्वागत प्रा. तुषार देशपांडे, सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान श्री. किशोर करवा, श्री. नीलेश कुलकर्णी यांचे स्वागत उद्योजक श्री. मनोज चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धनश्री दहिवदकर यांनी केले. वेदमंत्रपठण श्री. महेंद्र जोशीगुरुजी यांनी केले.
| सनातन प्रभात 26 वा वर्धापनदिन सोहळा | जळगाव | 1 मार्च 2026 | विशेष निमंत्रण
|
‘सनातन प्रभात’ हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ ! – नीलेश कुलकर्णी, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’
‘सनातन प्रभात’ संकेतस्थळ, ‘ॲप’, ‘ई-पेपर’, ‘डेली हंट’, ‘टेलिग्राम’, ‘एक्स’, ‘यू ट्यूब’ आदी सामाजिक माध्यमांतून प्रत्येक महिन्याला देश-विदेशांतील ८ लाखांहून अधिक लोक ‘सनातन प्रभात’मधील लेख आणि बातम्या वाचतात. ‘सनातन प्रभात’च्या ‘पॉडकास्ट’द्वारे हिंदुत्वनिष्ठांना जोडले जात आहे. ‘सनातन प्रभात’ आता प्रिंट, डिजिटल आणि सोशल अशा व्यापक स्वरूपात कार्यरत आहे. आज बंगाल, आसाम, मणीपूर, तसेच बांगलादेश, पाकिस्तान आदी कुठेही हिंदूंवर आघात झाला, अन्याय झाला, तर ‘सनातन प्रभात’ आवाज उठवते. ‘सनातन प्रभात’ हे केवळ एक प्रसारमाध्यम समूह नाही, तर विश्वातील हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ आहे.
समाजपरिवर्तनाच्या कार्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान मोलाचे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्थाएखाद्या गावात जेव्हा हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक होते, तसेच लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदी घटना घडतात, इतिहासाचे विकृतीकरण, देवतांचे विडंबन, गड-दुर्गांवर इस्लामी अतिक्रमण होते, त्याविरोधात ‘सनातन प्रभात’ वैध मार्गाने आवाज उठवते. बांगलादेशातील दिपू चंद्र दास या हिंदु युवकाला जाळण्यात आले. त्याविरोधात भारतभरात जागोजागी निदर्शने झाली, त्यासही ‘सनातन प्रभात’ने उचित प्रसिद्धी दिली. हिंदूंवर होणार्या आघातांविरोधात एक व्रतस्थ ऋषि म्हणून ‘सनातन प्रभात’ने वाचा फोडली आहे. जगभरात हिंदूंवर होणारे आघात समाजापर्यंत पोचवण्यास ‘सनातन प्रभात’ कटीबद्ध आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने समाजपरिवर्तनाच्या कार्यातही ‘सनातन प्रभात’चे योगदान मोलाचे आहे. |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले