
राजापूर – तालुक्यातील हातीवले टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ कोटी ६० लाख रुपयांहून अधिख किमतीचा अवैध मद्याचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका कंटेनरवर पाळत ठेवली आणि त्याची झडती घेतली. कंटेनरमध्ये १ सहस्र ३०० बॉक्स ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ नावाच्या मद्याचा साठा सापडला. या प्रकरणात राजस्थानमधील बारमेरचा २९ वर्षीय चालक गणेश कुमार पोकरराम याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ‘महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भरारी पथकाच्या प्रयत्नांनी यशस्वीरीत्या करण्यात आली आहे.
२. जिल्ह्यात अवैध मद्य विक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३. जिल्ह्यात कुठेही अवैध मद्यविक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी प्रशासनाला याविषयी तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !