अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 अहिल्यानगर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात खासगी शिकवणी घेणारा शिक्षक विशाल बारगळ याला २० वर्षे सक्तमजुरी आणि १३ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ. यु.जे. मोरे यांनी विविध कलमांन्वये ही शिक्षा ठोठावली आहे. १८ ऑगस्ट २०१८ या दिवशी पीडित मुलगी ही आरोपीच्या खासगी ‘स्पोकन इंग्लिश क्लास’ला (इंग्रजी बोलायला शिकण्याच्या शिकवणीवर्गाला) गेली होती. आरोपी विशाल याने पीडितेशी बळजोरी करत शारीरिक आणि अनैसर्गिक संबंध निर्माण केले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.