
ठाणे, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – बदलापूर येथे एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसचालक जयेश मुने याने विनयभंग केला. शाळेतून घरी सोडतांना बसमध्ये कोणतीही महिला साहाय्यक नव्हती. पोलिसांनी आरोपी बस चालकाविरुद्ध पॉक्सो, तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनीने घरी पोचल्यानंतर तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी तक्रार प्रविष्ट केली.
काही दिवसांपूर्वीही बदलापूरमधील शाळेच्या वाहनात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. वारंवार घडणार्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून ‘पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेऊन कठोर कारवाई करावी’, अशी मागणी होत आहे. नुकताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शहरातील शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता.
संपादकीय भूमिका
|
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !