
चंडीगड – येथील शाळा बाँबने उडवून देण्याच्या ई-मेलद्वारे मिळणार्या धमक्यांचे सत्र पुन्हा चालू झाले आहे. शहरातील विवेक हायस्कूल, गुरुकुल भवन विद्यालय आणि इतर अनेक खासगी अन् सरकारी शाळांना असे ई-मेल प्राप्त झाले आहेत. शाळा प्रशासनाने यासंदर्भात तात्काळ पोलिसांना कळवले. धमकीत सांगण्यात आले की, पुढील २ दिवसांत संपूर्ण चंडीगडमध्ये बाँबस्फोट होतील. यामुळे विद्यार्थ्यांनाही घरी पाठवण्यात आले आहे. या ई-मेलमध्ये पंजाब सचिवालय उडवून देण्याच्या धमकीचाही समावेश होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकारी, बाँब निकामी पथके आणि श्वान पथके घटनास्थळी पोचली. प्राथमिक अन्वेषणात संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात पहारा वाढवण्यात आला आहे.
पोलीस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ई-मेल पत्त्यावरून धमकी देण्यात आली होती, तो पत्ता पडताळला जात आहे. प्रशासनाने पालकांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीविषयी पोलिसांना त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !