‘जगदवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ?’ या स्तोत्राचे होते रचियेते

गाणगापूर (कर्नाटक) – श्री दत्त महाराजांच्या सेवेत संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले श्री दत्त संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष आणि थोर दत्तभक्त श्री भीम भटगुरुजी यांनी नुकताच देहत्याग केला. ते गाणगापूर येथील श्री दत्त मंदिराचे मुख्य पुजारी होते. श्री भीम भटगुरुजी यांच्या घराण्याला दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता.
श्री भीम भटगुरुजी यांना प.पू. जोगन विठामाई, सद्गुरु श्री शंकर महाराज, श्री गुळवणी महाराज, सद्गुरु श्री श्रीधर स्वामी, ॐ दत्त श्री ठाकूर महाराज, गुरुदेव प.पू. श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा सहवास लाभला होता. ‘जगदवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ?’ हे स्तोत्र ज्यांनी लिहिले, ते म्हणजे श्री भीम भटगुरुजी होय. त्यांच्या देहत्यागाने एक थोर दत्तभक्त निवर्तल्याची भावना भक्तांमध्ये आहे.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी