थकबाकीदारांच्या विरोधात महावितरण आक्रमक

रत्नागिरी – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महावितरणाच्या रत्नागिरी परिमंडलात वीजदेयकांच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा विविध श्रेणीतील तब्बल १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे महावितरण आता थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे.
थकबाकीचे स्वरूप
प्रामुख्याने घरगुती ग्राहकांकडे मोठी थकबाकी असून त्यासोबतच व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि लघु उद्योगांनीही अनेक महिन्यांपासून वीजदेयके भरलेली नाहीत. यामुळे महावितरणच्या दैनंदिन कामकाजावर आणि देखभालीच्या खर्चावर परिणाम होत आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई
महावितरणाने स्पष्ट केले आहे की, ज्या ग्राहकांनी वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरलेली नाही, त्यांचा वीजपुरवठा कोणत्याही पूर्वसूचनेविना खंडित केला जाईल. एकदा वीज कापली की, पुन्हा जोडणी करण्यासाठी थकबाकीसोबतच पुन्हा वीज जोडणी करण्याची अतिरिक्त रक्कमही भरावी लागणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा आर्थिक दंड वाढू शकतो.
सुटीच्या दिवशीही सुविधा
वसुलीचा वेग वाढवण्यासाठी महावितरणाने त्याची अधिकृत विद्युत् देयक भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्राहकांना रांगेत उभे राहण्यापेक्षा ‘महावितरण मोबाईल ॲप’ किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन देयक भरण्याचे आवाहन केले आहे.
महावितरणचे आवाहन
वीज सेवा खंडित होऊ नये, यासाठी वेळेवर देयक भरणे आवश्यक आहे. ‘ग्राहकांनी कठोर कारवाई टाळण्यासाठी थकबाकी त्वरित भरावी’, असे आवाहन महावितरणच्या रत्नागिरी परिमंडलातील वरिष्ठ अधिकार्यांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाएवढी थकबाकी होईपर्यंत महावितरण झोपले होते का ? |
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !