|
नवी देहली – भारतात गेल्या २० वर्षांत घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २० वर्षांपूर्वी देशात ०.६ टक्के महिलांनी घटस्फोट घेतला होता, तर आता हे प्रमाण १ टक्के झाले आहे. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’तून ही आकडेवारी समोर आली आहे. वर्ष १९८६-८७ नुसार घटस्फोटाच्या ८४९ प्रकरणांपैकी ५७० प्रकरणांत पतींनी घटस्फोटाची मागणी केली होती. हे प्रमाण ६७ टक्के होते; पण आता सुमारे ५८ टक्के महिला घटस्फोटासाठी पुढाकार घेत आहेत. याचा अर्थ पुरुषांनी घटस्फोट मागण्याचे प्रमाण ६७ टक्क्यांवरून ४२ टक्के झाले आहे.
१. मुंबई कौटुंबिक न्यायालयाच्या एका अभ्यासानुसार ४० टक्के प्रकरणांत लग्नानंतर ३ वर्षांतच संबंध दुरावतात. घटस्फोट मागणार्या महिला २५ ते ३४ वयोगटातील आहेत.
२. महाराष्ट्रात १८.७ टक्के, कर्नाटक ११.७ टक्के, बंगाल ८.२ टक्के, देहली ७.७ टक्के, तमिळनाडू ७.१ टक्के, तेलंगाणा ६.७ टक्के आणि राजस्थानमध्ये २.५ टक्के घटस्फोटांचे प्रमाण आहे.
३. ‘एडजुआ लीगल्स गूगल अॅनालिटिक्स २०२५’च्या अहवालानुसार लक्ष्मणपुरी, देहली, मुंबई, कोलकाता, भाग्यनगर आणि बेंगळुरू या शहरांत गेल्या ३ वर्षांत घटस्फोटाची प्रकरणे ३ पटींनी वाढली आहेत.
संपादकीय भूमिकाअध्यात्मशास्त्र आणि धर्मशास्त्र यांनुसार विवाह म्हणजे प्रारब्धभोग भोगण्यासाठी एकत्र येणे. हे भोग भोगतांनाच क्रियामाण कर्म वापरून पती-पत्नी यांनी साधना केली, तर ते ईश्वराच्या कृपेने चांगल्याप्रकारे संसार करून आनंदी जीवन जगू शकतात. असे होण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. |

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड